
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहिममधून निवडणूक लढविली पण त्यांचा पराभव झाला. पण आता निवडणुकीतील पराभवानंतर अमित ठाकरे यांच्या सोशल मीडियावरील पोस्टच चर्चेत आहे. हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे अशा आशयाची पोस्ट 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म वर अमित ठाकरे यांनी शेअर केली आहे.