.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यानंतर आणि भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरल्यानं आता नवा मुख्यमंत्री कोण असेल? याची चर्चा सुरु झाली आहे. यापार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपच्या नेतृत्वासोबत आज महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील उपस्थित असणार आहेत. पण विशेष म्हणजे या बैठकीला विनोद तावडेंनी देखील उपस्थित राहावं असे आदेश त्यांना अमित शहांकडून देण्यात आले आहेत. साम टीव्हीच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे.