

अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. 2019 मध्ये शिवसेनेचे (यूबीटी) नितिन देशमुख विजयी झाले होते. यंदा मात्र महायुती, महाविकास आघाडी (MVA) आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) यांच्यात चुरस पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे गटाने माजी आमदार बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी दिली, तर वंचितने मुळ काँग्रेसचे अॅड. नचिकोद्दीन खतिब यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मात्र शिवसेना (यूबीटी) तर्फे नितिन देशमुख यांनी आपले बळ आजमावले.
नितीन देशमुख 11 हजार 739 मतांनी विजयी झाले. त्यांना 82 हजार 088 मते मिळाली. तर वंचिते ए एन खातिब दोन नंबरवर राहीले. त्यांना 70 हजार 349 मते मिळाली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बळीराम सिरस्कार यांना 60 हजार 192 मते मिळाली. त्यांचा 20 हजार 231 मतांनी पराभव झाला.