
संग्रामपूर : जळगाव जामोद मतदारसंघात भाजप ने कांग्रेस चा पराभव करत पाचव्यांदा महाविजय मिळवला. यात डाँ संजय श्रीराम कुटे विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. तर हा विजय मतदार संघातील मातृशक्ती आणि मायबाप जनतेचा असल्याची पहिली प्रतिक्रिया विजयानंतर आमदार डाँ कुटे यांनी दिली.निकाल घोषीत होण्याअगोदरच मतमोजणी चे ठिकाणी कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला.