
मुंबई : आषाढी एकादशी हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. यादिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. यंदा ६ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. पंढरपूरला जाण्यासाठी आतापासूनच रेल्वे आणि एसटी तिकिटांसाठी प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र मोठी गर्दी पाहता अनेकांच्या तिकीट बुकिंगदरम्यान मोठ्या अडचणी येत आहेत. यामुळे पंढरपूरला जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे.