Eknath Shinde: प्रकृती खालावली! एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयात दाखल; शपथविधीला जाणार की नाही?
Eknath Shinde Health Update: एकनाथ शिंदे यांचा ताप कमी-जास्त होत आहे. त्यामुळे अंगामध्ये कणकण आहे. घशातही इन्फेक्शन असल्याने डॉक्टरांनी त्यांच्या काही तपासण्या केल्या. डेंग्यू आणि मलेरियाच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे.
मुंबईः राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या चार दिवसांपासून आजारी आहेत. परंतु प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने शेवटी ते मंगळवारी दुपारी ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या काही तपासण्या केल्या आहेत.