.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Eknath Shinde Resignation: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. मात्र मुख्यमत्री कोणत्या पक्षाचा होणार याचा तिढा सुटलेला नाही. भाजपच्या जागा जास्त असल्याने मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा व्हावा अशी कार्यकर्त्यांची भावना आहे तर दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी बिहार पॅटर्न राबवावा असे शिवसेना गटाच्या शिवसैनिकांची मागणी आहे, दरम्यान शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मध्यरात्री एक्स या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर पोस्ट करत शिवसैनिकांना आवाहन केलं आहे.