Latest Maharashtra News: महायुतीकडून कागल तालुक्यातून ॲड. वीरेंद्र मंडलिक यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली. डॉ. खासदार श्रीकांत शिंदे यांची जनसंवाद यात्रा सुरू आहे.
या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्यांनी श्रीक्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामा यांचे दर्शन घेतले व पदाधिकारी बैठकीस मार्गदर्शन केले. त्यावेळी या बैठकीत कार्यकर्त्यांनी ही मागणी केली.