.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
E-Voting Machine: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करत निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला गेला. या प्रकरणी विरोधकांनी न्यायालयातही धाव घेतलीय. दरम्यान, महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं म्हणत निकाल अचूक असल्याचं सांगितलंय. विधानसभा निवडणुकीतील १४४० व्हीव्हीपॅट मशिनची पडताळणी करण्यात आली. त्याचे निकाल हे मशिनच्या आकडेवारीशी जुळले असल्याची माहिती किरण कुलकर्णी यांनी दिली. डेटा अचूक असल्याचं पडताळण्यासाठी व्हीव्हीपॅटमधील मतपत्रिका आणि ईव्हीएमवरील डेटा चेक करण्यात आला.