
गोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. गोरेगाव हे मुंबईचे एक उपनगर आहे. जे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. गोरेगावमध्ये मराठी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. 2019 मध्ये हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने जिंकला होता. यंदा इथे भाजपच्या विद्या ठाकूर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार समीर देसाई हे रिंगणात आहेत.