स्वाती कोरी म्हणाल्या, "निवडणुकीत निसटता पराभव जिव्हारी लागणारा आहे. मात्र, एक लाख ३३ हजारांहून अधिक मतदारांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास पुढील काळात काम करण्यासाठी प्रेरणादायी आहे."
गडहिंग्लज : ‘विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाने कार्यकर्त्यांनी खचून न जाता परिवर्तनासाठी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे’, असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Ghatge) यांनी केले. निवडणूक निकालानंतर घाटगे यांनी गडहिंग्लजचा आभार दौरा केला. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) हॉलमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.