
Shivsena UBT Babaji Kale Khed Alandi Assembly Election 2024 final result live : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असेच चित्र बऱ्याच ठिकाणी दिसले. परंतु असे असले तरी काही ठिकाणी बंडखोरीही झाली. खेड-आळंदीमध्येही असेच चित्र दिसणार का, अशी परिस्थिती काही दिवसांपूर्वी होती.
मात्र, यंदा महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप मोहिते पाटील यांना, तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून बाबा काळे यांना उमेदवारी देण्यात आहे. तसे एकूण १३ उमेदवार रिंगणात होते. पण त्यातही दिलीप मोहिते पाटील आणि बाबा काळे यांच्यातील लढत महत्त्वाची होती.
दरम्यान माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. बाबा काळे यांनी ५१७४३ मतांच्या फरकाने विजय मिळवला. बाबा काळे यांना १५०१५२ मतं मिळाली. दिलीप मोहिते यांना ९८४०९ मतं मिळाली.