अडीच वर्षांपूर्वी राज्यात राजकीय समीकरणे बदलली. त्याचा फटका जिल्ह्यातील जागा वाटपांवर झाला आहे.
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसह (Mahavikas Aghadi) महायुतीचे जागा वाटप आणि उमेदवारी जवळपास निश्चित झाली असून, दोन्ही आघाडींत जागा वाटपात काँग्रेसचा मोठा भाऊ ठरला आहे. काँग्रेसला (Congress) सर्वाधिक पाच, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला त्या खालोखाल तीन जागा, तर ठाकरे गटाला दोन जागा मिळाल्या आहेत. महायुतीत भाजपला सध्या तरी दोनच, शिवसेना शिंदे गटाला दोन, एक अपक्षाला व दोन राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाल्या.