ठाकरे सेनेची अद्यापही पाहिजे तितकी नाळ जनतेशी जुळली नाही. त्यांचा कनेक्ट किती आहे, त्यांचे अंतर्गत राजकरण या सर्वांचा पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे.
कोल्हापूर : मूळ शिवसेना (Shiv Sena) फुटीनंतर उभारी घेण्यासाठी प्रयत्न करणारी ठाकरे सेना जिल्ह्यात आता केवळ नावापुरताच राहिली आहे. एकही आमदार नसल्यामुळे मरगळलेल्या ठाकरे सेनेला एखाद्या आमदाराने उभारी मिळेल, या आशेचाही आता भंग झाला आहे. विधानसभा निवडणुकीने ठाकरे सेनेला (Thackeray Sena) त्यांचे स्थान दाखवून दिले आहे. जनतेशी नाळ जोडण्याचे आव्हान आता ठाकरेसेनेसमोर उभे राहिले आहे.