विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत महायुतीच्या दहाही उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला.
कोल्हापूर : ‘जिल्ह्यातील महायुतीच्या (Mahayuti) विजयाचे शिल्पकार’, ‘१०-०’, ‘खरे दादा’, ‘किंगमेकर’ अशा उपाधीसह शहराच्या कानाकोपऱ्यात लावलेले माजी खासदार प्रा. संजय मंडलिक (Prof. Sanjay Mandlik) यांचे फलक चर्चेचा विषय ठरले आहेत. कार्यकर्त्यांनी लावलेल्या या फलकांतून कागलच्या विजयातही आपले योगदान असल्याचा संदेश देण्यात आला आहे.