काँग्रेसच्या उमेदवारीच्या घोळाने गाजलेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेस पुरस्कृत राजेश लाटकर विरुध्द माजी आमदार राजेश क्षीरसागर अशी काटाजोड लढत आहे.
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) मतदानानंतर निकालाची प्रचंड उत्सुकता लागली आहे. आकडेमोडीत तज्ज्ञ असलेले विविध पक्षांचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि या संदर्भातील यंत्रणांचा कानोसा घेतला असता, जिल्ह्यात महायुतीचा (Mahayuti) वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही जास्तीत जास्त जागा मिळण्याचा दावा केला आहे.