लाटकर यांची समजूत काढण्यासाठी आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी दूरध्वनीवरून त्यांच्याशी चर्चा केली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची (Congress) उमेदवारी डावललेल्या राजेश लाटकर (Rajesh Latkar) यांना आपल्या पक्षात सामावून घेण्यासाठी विरोधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे. महामंडळावर वर्णी किंवा महानगरपालिका पातळीवर सक्षम नेतृत्व तयार करण्याची जबाबदारीही लाटकर यांच्यावर देण्याबाबत चर्चा होत असल्याची माहिती आहे.