
मुंबई: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थींना जानेवारी महिन्याचा हप्ता २६ जानेवारीपूर्वी वितरित केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो महिलांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेसाठी ३,६९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.