Maharashtra Assembly Election 2024 esakal
Maharashtra Election 2025 Result
Maharashtra Election : सर्वच मतदारसंघांत 'लक्ष्मी' दर्शन जोरात; पाकिटांसह गिफ्ट कूपन्सही कार्यकर्त्यांकडून घरपोच
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या दहा जागांसाठी बुधवारी (ता. २०) मतदान होत आहे.
Summary
गेल्या दोन दिवसांपासून मतदारसंघांत मतदारांसाठी मटणाची पाकिटे आणि मसाल्यासाठीचे पैसे वाटप जोरात झाले. त्यानंतर आता ‘लक्ष्मी’ दर्शन किंवा कूपन्स वाटप सुरू आहे.
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीतील (Maharashtra Assembly Elections) जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात ‘लक्ष्मी’ दर्शन जोरात सुरू झाले आहे. आचारसंहिता पथकाला थांगपत्ताही लागू न देता प्रमुख कार्यकर्त्यांकडून थेट मतदारांच्या घरात त्या घरातील मते किती, याचा हिशोब करून प्रती मतदान पाकिटे किंवा ‘गिफ्ट कूपन्स’ देणारी यंत्रणा कार्यरत झाली आहे.
