ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटमध्ये मतदानामध्ये फरक दिसत असल्याची उदाहरणे राज्यभरातून समोर येत आहेत.
कोल्हापूर : जिल्ह्यातील करवीर, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, हातकणंगले, शिरोळ विधानसभा मतदारसंघांतील व्हीव्हीपॅटमधील मतमोजणी व्हावी, अशी मागणी काँग्रेसकडून (Congress) निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाकडे (State Election Commission) केली आहे. यासाठी आवश्यक असणारे शुल्कही भरले आहे.