शेतकरी व कामगारांच्या हिताच्या प्रश्नावर शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षांनी आजवर शेकडो आंदोलने केली.
कोल्हापूर : एकेकाळी शहरात प्राबल्य असलेल्या डाव्या पक्षांनी यंदा विधानसभा निवडणुकीपासून चार हात लांब थांबणे पसंत केले. संधी असून एकही जागा त्यांनी लढवली नाही. निवडणुकीत त्यांनी पाठिंबा दिलेल्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे डाव्यांची अवस्था संभ्रमीत झाल्याचे चित्र आहे.