
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला असला तरी आता सर्वांच्या नजरा महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या होत्या. जुन्या मंत्र्यांना हटवून नवे चेहरे आणण्याची रणनीती सुरू झाली होती. यातच अनेक बड्या नेत्यांचा पत्ता कट करून नव्यांना संधी देणार असल्याचे समोर आले होते. मात्र हा महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा प्रश्न सर्वांनाच होता. मात्र आता याचे उत्तर मिळाले आहे. १५ डिसेंबरला महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार निश्चित करण्यात आला आहे.