Nawab Malik Esakal
Maharashtra Election 2025 Result
Nawab Malik: नवाब मलिकांना अखेर 'ए, बी' फॉर्म मिळाला! 'या' मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज
आपल्याला निवडणूक लढवण्यापासून रोखलं जात आहे आणि रोखणारा कोण आहे? याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्य़ेष्ठ नेते नवाब मलिक यांनी आजच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारी अर्ज भरले होते. तसंच आपल्याला निवडणूक लढवण्यास विरोध होत असतानाही आपण निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसंच पक्षानं जर वेळेत एबी फॉर्म दिला तर ठीक अन्यथा अपक्ष लढू असा इशारा दिला होता. पण ताज्या माहितीनुसार दुपारी ३ वाजेपर्यंत मलिकांना राष्ट्रवादी काँग्रेसडून एबीफॉर्म मिळाला आणि त्यांनी अधिकृत उमेदवार म्हणून अर्जही दाखल केला.

