
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसचा गेल्या 15 वर्षांपासून अजिंक्य मतदारसंघ असलेल्या मालाड पश्चिममध्ये भाजपने विनोद शेलार यांच्या रूपात कडवं आव्हान काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्यासमरो उभं केलं. पण अस्लम शेख यांनी कडवी झुंज देत काँग्रेसचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात यश मिळवलं. अस्लम शेख मालाड पश्चिम मधून विजयी झाले असून भाजपला हा मतदारसंघ जिंकण्यात पुन्हा एकदा अपयश आलं आहे. 98202 मतांनी अस्लम शेख विजयी झाले आहेत.
विनोद शेलार हे भाजप नेते आशिष शेलार यांचे बंधू आहेत. विनोद यांचा विजय व्हावा म्हणून आशिष यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती पण त्यात त्यांना अपयश आलं आहे.