

Ladki Bahin Yojana
esakal
लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC दुरुस्तीसाठी आता एकच संधी मिळणार आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक महिलांचे वास्तव्य दुर्गम आणि ग्रामीण भागात आहे. त्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना त्यांच्याकडून काही त्रुटी राहणे अपरिहार्य मानले जाते. अशा त्रुटी दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे असंख्य अर्ज आणि निवेदने महिला व बालविकास विभागाला प्राप्त झाले आहेत, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे तटकरे म्हणाल्या.