Aslam Sheikh Education Issue
Aslam Sheikh Education IssueEsakal

Aslam Sheikh Education: "आधी बारावी अन् मग नववी..." काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या शिक्षणावरुन गोंधळ; भाजपच्या आरोपामुळे खळबळ

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: उमेदवारी अर्जांची छाननी झाली असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर आहे.
Published on

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज छानणी प्रक्रियेवेळी काँग्रेसचे उमेदवार असलम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर विरोधी पक्षांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. असलम शेख यांनी आपल्या अर्जात त्यांच्या शिक्षणासंदर्भात चुकीची माहिती दिल्याचा आरोप विरोधी उमेदवारांकडून करण्यात आला आहे.

यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार देखील केली आहे. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याने ग्राह्य धरला आहे. दरम्यान या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे मालाड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार विनोद शेलार यांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com