Sharad Pawar Speech in Markadwadi : ...तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, शरद पवार यांनी मारकडवाडीतून ठणकावले
Sharad Pawar : अमेरिकेत आजही मतदान पत्रिकेवर मतदान होत असून अनेक देशांनी ईव्हीएमचा त्याग केला आहे. लोकांच्या मनात शंका आहेत त्यांचं निरसन झाले पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
महाविकास आघाडीच्या ईव्हीएम विरोधातील लढ्याचं केंद्र बनत चाललेल्या मारकडीवाडी गावाला शरद पवार यांनी आज भेट दिली. त्यांनी ग्रामस्थांशी आणि पत्रकारांशी संवाद साधताना निवडणूक पद्धतीत बदल होणे गरजे असल्याचे विधान केले आहे.