विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाविजय झाला आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांचा निसटता पराभव झाला आहे. त्यामुळे मविआ आणि पराभूत उमेदवारांमध्ये नाराजी आहे. चिन्ह साधर्म्य आणि सारख्या नावांमुळे अनेक उमेदवारांना निवडणुकीत फटका बसला असल्याचे समोर आले आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक अवघ्या 377 मतांनी पराभूत झाले मात्र त्यांच्या अनोख्या बॅनरची आता चर्चा होतेय.