राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मुंबईतील सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी नेत्यांची रीघ लागली आहे. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदाराने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) हे फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहचले आहेत.