
नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आणि विधानसभा निवडणूकीत विरोधात काम केल्याचा रागातून शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने भाजपची कार्यकर्त्या महिलेला मारहाण करुन तिचा विनयभंग केल्याचा आरोप केला गेला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे दोन गटात राडा झाला. नवनिर्वाचित आमदार आमश्या पाडवी यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. महिलने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.