
Mahayuti Cabinet Oath Taking Ceremony: महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांच्यातील मुख्यमंत्रिपदासाठीची लढत संपली असली तरी मंत्रिमंडळ आणि मंत्र्यांची नावे निश्चित झालेली नाहीत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातून किती मंत्रिपदे दिली जाणार आणि कोणते खाते कोणाला मिळणार, याबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही. यातच आता नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तारीख समोर आली आहे. यात हा सस्पेंस उघडणार आहे.