देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. नागपूर राजभवनात एकूण 39 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी भाजपच्या सर्वाधिक 19 मंत्र्यांनी शपथ घेतली, तर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. यावेळी महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला असून अनेक जुन्या मंत्र्यांनाही डावलण्यात आले आहे. यात शिवसेनेकडून काही नेत्यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर जाणून घेऊया ते आहेत तरी कोण?