Rahul Gandhi Rally In Maharashtra: राहुल गांधींचे मिशन महाराष्ट्र! विधानसभेसाठी घेणार 20 सभा, कोण असणार टार्गेट?

Rahul Gandhi Rally For Vidhan Sabha: यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अनपेक्षितपणे दमदार कामगिरी करत सर्वाधिक 13 जागा जिंकत राज्यासह महाविकास आघाडीमध्ये अव्वल स्थान मिळवले होते.
Rahul Gandhi Rally In Maharashtra
Rahul Gandhi Rally In MaharashtraEsakal
Updated on: 

महाराष्ट्रात येत्या काही दिवासांमध्ये विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. यासाठी निवडणूक आयोगाने नुकताच प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडून निवडणूक तयारीचा आढावा घेतला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीतील प्रत्येक पक्षानेही यासाठी तयारी सुरू केली आहे.

दरम्यान लोकसभेत महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ते 10 वर्षांनी राज्यात सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात प्रदेश काँग्रेसचे प्रयत्न पूर्णत्त्वास जावे यासाठी लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी हातभार लावणार असून, ते राज्यात 15-20 सभा घेणार असल्याची माहीती समोर आली आहे.

Loading content, please wait...