मविआच्या ईव्हीएम विरोधी लढ्याचे केंद्र बनत चाललेल्या मारकडवाडीला शरद पवार यांनी भेट दिली. माळशिरस मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेतले तर राजीनामा देणार असल्याची घोषणा केली, आहे. तर भाजपचे पराभूत उमेदवार राम सातपूते यांनीही त्यांचे आव्हान स्वीकारत मतपत्रिकेवर मतदाना घेण्याची तयारी दर्शविली आहे.