
Sakri Assembly Election 2024 result Maharashtra Vidhan Sabha: साक्री या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या साक्री विधानसभा क्षेत्रासाठीची निवडणूक एकूण १८ उमेदवार रिंगणात असल्याने चुरशीची होणार, हे तालुक्यातील जनतेला लक्षात येत होते. मात्र, अखेर या चुरशीच्या निवडणुकीत विद्यमान आमदार तथा शिवसेनेच्या उमेदवार मंजुळा गावित यांनी आपल्याकडे आमदारकीची माळ खेचून आणण्यात यश मिळविले.
साक्री विधानसभेत माजी खासदार बापू चौरे यांचे पुत्र प्रवीण चौरे हे काँग्रेस तथा महाविकास आघाडीकडून उमेदवारी करीत होते. कोरी पाटी हा एक विषय वगळता तालुक्यात आजवर झालेल्या विकासकामांचा भ्रष्टाचार, तालुक्यात नवीन उद्योगांची उभारणी, पायाभूत सुविधांमध्ये असलेली कमतरता या मुद्द्यांवर महाविकास आघाडीने आपली निवडणूक लढवली होती.