
Mauli Katke won Shirur Assembly Election 2024 final result live : शिरूर विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र २०१९ नंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर आता येथे कोणत्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार, हे औत्सुक्याचे होते.
या मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक पवार व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्यात दुरंगी लढत पाहायला मिळाली. ही लढत माऊली कटके यांनी जिंकत माजी आमदार अशोक पवार यांना पराभवाचा धक्का दिला.
माऊली कटके यांनी ७४,५५० मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांना १९२२८१ मतं मिळाली, तर अशोक पवार यांना ११७७३१ मतं मिळाली.