
महाराष्ट्रात महायुतीचा मोठा विजय झाल्यानंतर 5 डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री कोण होणार यावरून महायुतीमध्ये गदारोळ सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी भाजपच याचा निर्णय घेणार असल्याचं म्हटलं असलं, तरी अजूनही अटकळ थांबताना दिसत नाहीत. ज्या पद्धतीने ते त्यांच्या गावी गेले आणि त्यानंतर सभा रद्द केल्या जात आहेत, त्यामुळे ते निराश असल्याच्याही शक्यता बळावत आहेत. अशातच त्यांना आता शिवसेनेच्या खासदारांनी फोन केला आहे. तसेच खातेवाटपावर मोठी भीती व्यक्त केली आहे.