Uddhav ThacerayEsakal
Maharashtra Election 2025 Result
Shiv Sena UBT: विधानसभेच्या रणधुमाळीत उद्धव ठाकरेंना धक्का; आणखी एका नेत्याने सोडली साथ
Uddhav Thackeray:देवेंद्र गोडबोले यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीलाही फटका बसू शकतो अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे.
शिवसेना ठाकरे गटाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागपुरात मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा पाठवला आहे. यावेळी त्यांनी पाठवलेल्या पत्रात पक्षप्रमुखांनी राजीनामा स्वीकारावा अशी विनंती केली आहे.
मागील 17 वर्षांपासून पक्ष संघटनेसाठी काम करत असून सुद्धा पक्ष पाठीशी उभार राहत नाही अशी त्यांची भावना असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
