
कोल्हापूर: ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुश यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. कर्नाटकातून येणारी ऊस वाहतुकीची वाहने अडवून चाकातील हवा सोडण्यात येत असल्याने विविध मार्गावर उसाने भरलेले वाहने थांबून राहिली आहेत. त्यामुळे शिरोळ दरम्यानच्या सलगर-सदलगा राज्य मार्गावर ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या रांगा लागल्या होत्या.