Solapur Election Result: सोलापूर जिल्ह्यातील ‘हे’ ७ उमेदवार आमदार फिक्स! माढा, माळशिरस, बार्शी व पंढरपूर-मंगळवेढ्यात सस्पेन्स

Solapur Assembly Election Result 2024: आतापर्यंत पोस्टल मतांची मोजणी सुरु झाली आहे. आता मतदानाच्या फेऱ्या सुरु झाल्या असून दुपारी साडेचारपर्यंत निकाल हाती येतील. आतापर्यंतच्या मतमोजणीत दुरंगीच लढती पहायला मिळत आहेत.
Solapur Election Result
Solapur Election Resultsakal
Updated on

सोलापूर : आतापर्यंत पोस्टल मतांची मोजणी सुरु झाली आहे. आता मतदानाच्या फेऱ्या सुरु झाल्या असून दुपारी साडेचारपर्यंत निकाल हाती येतील. आतापर्यंतच्या मतमोजणीत दुरंगीच लढती पहायला मिळत आहेत.

माढ्यात अपक्ष रणजित शिंदे व ‘तुतारी’चे अभिजीत पाटील यांच्यात तर करमाळ्यात ‘तुतारी’चे नारायण पाटील व अपक्ष संजयमामा शिंदे, पंढरपूर-मंगळवेढ्यात भाजपचे समाधान आवताडे व काँग्रेसचे भगिरथ भालके, शहर उत्तरमध्ये भाजपचे विजयकुमार देशमुख व ‘तुतारी’चे महेश कोठे, सांगोल्यात शेकापचे बाबासाहेब देशमुख यांच्यात रस्सीखेच सुरु आहे.

शहर मध्यमध्ये भाजपचे देवेंद्र कोठे व एमआयएमचे फारुक शाब्दी, अक्कलकोटमध्ये भाजपचे सचिन कल्याणशेट्टी व काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे, मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे यशवंत माने व ‘तुतारी’चे राजू खरे यांच्यात चुरस पहायला मिळत आहे. माळशिरसमध्ये उत्तमराव जानकर व राम सातपुते यांच्यात चुरस असून दक्षिण सोलापूरमध्ये सुभाष देशमुख आघाडीवर आहेत.

विजयाकडे वाटचाल...

  • अक्कलकोट : सचिन कल्याणशेट्टी (भाजप)

  • सोलापूर शहर उत्तर : विजयकुमार देशमुख (भाजप)

  • सोलापूर शहर मध्य : देवेंद्र कोठे (भाजप)

  • दक्षिण सोलापूर : सुभाष देशमुख (भाजप)

  • करमाळा : नारायण पाटील (तुतारी)

  • मोहोळ : राजू खरे (तुतारी)

  • सांगोला : बाबासाहेब देशमुख (शेकाप)

  • ---------------

  • दोघांमध्ये रस्सीखेच...

  • पंढरपूर- मंगळवेढा : समाधान आवताडे किंवा भगिरथ भालके

  • माळशिरस : राम सातपुते किंवा उत्तमराव जानकर

  • बार्शी : दिलीप सोपल किंवा राजेंद्र राऊत

  • माढा : अभिजीत पाटील किंवा रणजित शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com