Mahesh Baldi Won Uran Assembly Election 2024: उरणमधील तिरंगी लढती महेश बालदी यांची सरशी; प्रीतम म्हात्रे अन् मनोहर भोईर पराभूत

BJP Mahesh Baldi won Uran Assembly Election 2024 result Maharashtra Vidhan Sabha nikal: आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. उरणमध्ये यंदा महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे मनोहर भोईर, भाजप महायुतीचे आमदार महेश बालदी आणि शेकापचे उमेदवार प्रीतम जनार्दन म्हात्रे अशी तिरंगी लढत झाली.
Maharashtra Assembly Election 2024 result
Uran Assembly Election 2024 resultSakal
Updated on

BJP Mahesh Baldi won Uran Assembly Election 2024 final result live : महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरली. २०१९ नंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय बदल झाला. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील एक महत्त्वाचा मतदार संघ म्हणजे उरण.

रायगड जिल्ह्यातील हा मतदार संघ मावळ लोकसभा मतदार संघात मोडतो. यंदा उरणमध्ये तिरंगी लढत झाली. उरणमध्ये महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे मनोहर भोईर, भाजप महायुतीचे आमदार महेश बालदी आणि शेकापचे उमेदवार प्रीतम जनार्दन म्हात्रे अशी तिरंगी लढत झाली.

या तिरंगी लढतीत महेश बालदी यांनी बाजी मारली. त्यांनी ६५१२ मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांना ९५३९० मतं मिळाली. प्रीतम म्हात्रे यांना ८८८७८ मतं मिळाली, मनोहर भोईर यांना ६९८९३ मतं मिळाली.

Maharashtra Assembly Election 2024 result
Prashant Thakur Won Panvel Assembly Election 2024: प्रशांत ठाकूर यांचा विजयाचा चौकार; शेकापचे बाळाराम पाटील पराभूत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com