

Parli Nagar Parishad Election Result
esakal
Parli Nagar Parishad Election Results 2025: परळीची झालेली बदनामी बघता इथली जनता मतपेटीतून उत्तर देईल, हा विश्वास धनंजय मुंडेंनी प्रचारसभेत बोलून दाखवला होता. धनंजय मुंडेंचं हे म्हणणं परळीकरांनी आज सार्थ ठरवलेलं दिसतंय. कारण नगर पालिका त्यांच्या ताब्यात आली आहे.
पक्षानं स्टार प्रचारक केलं असूनही धनंजय मुंडेंना परळी बाहेर कुणीही बोलावलं नव्हतं. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यातही सभा झाल्या नाहीत. त्यांनी परळीत अगदी कोपरा सभा, पारावरच्या सभा घेतल्या अन् बीडबाहेर फक्त परभणीच्या गंगाखेडमध्ये आपल्या भगिनी उर्मिला केंद्रेंसाठी प्रचार सभा घेतल्या.