
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मे 2025 मध्ये निवडणूक प्रक्रिया चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले असले, तरी प्रभाग रचना, आरक्षण आणि मतदार याद्यांसाठी लागणारा वेळ पाहता ही मुदत अपुरी ठरत आहे. त्यामुळे आयोगाने सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मागण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नंतर नगर परिषदा आणि शेवटी महापालिकांच्या निवडणुका घेण्याचा क्रम निश्चित करण्यात आला आहे.