Maharashtra Municipal Elections 2025 Seat Sharing Row
esakal
महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींनासुद्धा वेग आला आहे. युती-आघाडी बाबत राजकीय नेत्यांकडून बैठकांचं सत्र सुरु आहे. मात्र, अनेक मनपात यावर अजून तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या मनपात कोणाची कुणाशी युती होईल. हे ठामपणे सांगता येत नाही. अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, धुळे या मनपात युती आघाडीमध्ये जागावाटपावरून अजूनही वाद सुरु आहेत.