Maharashtra municipal elections ( AI image)
esakal
Ahead of Maharashtra municipal elections, authorities seized washing machines in Pimpri-Chinchwad : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी उद्या मतदान होणार असून त्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. मात्र, मतदानापूर्वीच मतदारांना लुभावण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या १९ वॉशिंग मशीन जप्त करण्यात आल्या असून नवी मुंबईत पैशांनी भरलेल्या बॅगा आढळून आल्या आहेत. पुणे, ठाणे आणि अमरावतीतही पैसे वाटल्याचा प्रकार समोर आल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.