New Ward-Wise Voting System Explained
esakal
Maharashtra Municipal Elections introduce a new ward-wise voting system : राज्यात 29 महानगरपालिकांसाठी निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष ( Political Party ) निवडणुकीच्या तयारीत असून उमेदवारांकडून जोरदार प्रचारही सुरू आहे. विशेष म्हणजे यंदा महानगरपालिकेत होणारी निवडणूक ही प्रभाग रचनेनुसार ( New Ward-Wise System ) होणार आहे. त्यामुळे एका प्रभागात चार उमेदवारांचं पॅनल असणार आहे. अशावेळी चार उमेदवारांसाठी स्वतंत्र मतदान करावं लागणार आहे.