
Manipur Election: भाजपने तिकीट नाकारताच नेते काँग्रेसच्या गोटात
इम्फाळ : पक्षाने तिकीट नाकारले गेल्याने भाजपचे आमदार पी. सरतचंद्र यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबर एन. बिरेन आणि एन. जॉयकुमार यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसने या तिघांचे पक्षात स्वागत केले आहे. (Manipur Assembly Election)
मणिपूरमध्ये भाजप आणि ‘एनपीपी आघाडीचेच सरकार आहे. मात्र, या दोघांमध्ये निवडणूकपूर्व आघाडी झालेली नाही. राज्यातील सर्व ६० जागा लढविणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे. राज्यात काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपच्या तीन मोठ्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने या पक्षाला बळ मिळाले आहे. तसेच, भाजपतर्फे निवडणूक लढविण्याची इच्छा असताना पाच इच्छुकांनी आज नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये प्रवेश केला.
हेही वाचा: लोकशाही ही 'वैयक्तिक' नियमानुसार नाही तर...: राज्यपालांनी ममतांना खडसावले
भाजपने तिकीट नाकारलेल्यांना आम्ही संधी देऊ, मात्र त्यांच्यात निवडणूक जिंकण्याची क्षमता हवी, असे ‘एनपीपी’चे नेते आणि उपमुख्यमंत्री जॉयकुमार यांनी सांगितले. भाजपने तिकीट नाकारल्याने आणि संधी मिळण्याची कोणतीही शक्यता नसल्याची खात्री झाल्याने सामाजिक कार्यकर्ते लॉरेम्बाम संजय यांच्यासह पाच जणांनी आज ‘एनपीपी’मध्ये प्रवेश केला. भाजपने अनेक आमदारांना आणि इच्छुकांना उमेदवारी नाकारल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर नाराजीचे वातावरण आहे. नाराज नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे बॅनर आणि झेंडे जाळून टाकले.
Web Title: Manipur Assembly Elecrtion Updates Congress
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..