मणिपुरात भाजपची जोरदार मुसंडी; राज्यात फुललं 'कमळ', पाहा विजयी उमेदवारांची यादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manipur Election Result 2022

राज्यात पुन्हा एकदा भाजप सत्तेच्या जवळ जाताना दिसतंय.

Manipur Election Result : भाजपची जोरदार मुसंडी; राज्यात फुललं 'कमळ'

Manipur Election Result 2022 : मणिपूरमध्ये विधानसभेच्या 60 जागांसाठीचे निकाल हाती येऊ लागेल आहेत. राज्यात पुन्हा एकदा भाजप (BJP) सत्तेच्या जवळ जाताना दिसतंय. सुरुवातीच्या कलानुसार भाजपनं आतापर्यंत 60 पैकी 28 जागी जिंकल्या आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांत भाजप 28 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 09, एनपीपी 09 आणि इतर 08 जागांवर आघाडीवर आहेत. चला तर मग जाणून घेऊ विजयी उमेदवार..

मतदारसंघ उमेदवार पक्ष

खुंद्रकपम ठोकचोम लोकेश्वर सिंह (Thokchom Lokeshwar Singh) काँग्रेस

वांगखेम केशम मेघचंद्र सिंग (Keisham Meghachandra Singh) काँग्रेस

केसमथोंग सपम निशिकांत सिंह (SAPAM NISHIKANT SINGH) अपक्ष

वांगोई खुरैजम लोकेन सिंह (KHURAIJAM LOKEN SINGH) एपीपी

थांगमेईबंद खुमुकचम जॉयकिसन सिंह (Khumukcham Joykisan Singh) जनता दल

टिपाईमुख न्गुरसांगलूर सनते (Ngursanglur Sanate) जनता दल

जिरिबम मो. अछाब उद्दीन (MD. ACHAB UDDIN) जनता दल

वाबगई डॉ. उषम देबेन सिंह (Dr.USHAM DEBEN SINGH) भाजप

याइस्कुल ठोकचोम सत्यब्रत सिंग (Thokchom Satyabrata Singh) भाजप

हेनगंग नॉंगथोम्बम बीरेन सिंग (NONGTHOMBAM BIREN SINGH) भाजप

थंगा टोंगब्रम रॉबिंद्रो सिंग (Tongbram Robindro Singh) भाजप

कांगपोकपी नेमचा किपगेन (Nemcha Kipgen) भाजप

केराव लोरेम्बम रामेश्वर मीतेई (Lourembam Rameshwor Meetei) भाजप

कोन्थौजम डॉ. सपम रंजन सिंह (Dr. Sapam Ranjan Singh) भाजप

हियांगलाम डॉ. युम्नाम राधेश्याम सिंह (DR. YUMNAM RADHESHYAM SINGH) भाजप

खेत्रीगाव शेख नूरुल हसन (Sheikh Noorul Hassan) एनपीपी

हेंगलेप लेटझामंग हाओकिप (Letzamang Haokip) भाजप

लंगथबल करम श्याम (Karam Shyam) भाजप

सैतु हाओखोलेत किपगन (Haokholet Kipgen) अपक्ष

हेही वाचा: Manipur : सलग दुसऱ्यांदा भाजपची बहुमताच्या दिशेनं वाटचाल; 29 जागांवर आघाडी

मणिपूर विधानसभेच्या 60 जागांसाठी पहिला टप्प्यातील मतदान 28 फेब्रुवारी तर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 मार्च 2022 रोजी पार पडले असून, याचा निकाल आज लागला. सध्या विधानसभेत भाजपचे (BJP) 28, काँग्रेस 15, NPP 4, NPF 4, तृणमूल 1 आणि 1 अपक्ष सदस्य आहेत. विधानसभेच्या 7 जागा अजूनही रिक्त आहेत. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 19 मार्च 2022 रोजी संपत आहे. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यात साधारण 78 टक्के तर, दुसऱ्या टप्प्यात 76.04 टक्के मतदान पार पडलं होतं.

हेही वाचा: मुस्लिम बहुल भागात कोणाचं 'गणित' चुकलं; सपापेक्षा भाजप का ठरली सरस!

मणिपूरमध्ये विधानसभेच्या 60 जागा असून हे 16 जिल्हे असलेले राज्य आहे. सध्या येथे 12 वी विधानसभा अस्तित्वात आहे. सध्या याठिकाणी भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीचं सरकार असून एन बिरेन सिंग मुख्यमंत्री आहेत. मणिपूरमध्ये शेवटची विधानसभा निवडणूक 2017 मध्ये 2 टप्प्यात पार पडली होती, ज्यामध्ये एकूण 86.63% मतदान झालं होतं. या निवडणुकीत काँग्रेसला 28, भाजपला 21, NPF ला 4, NPP ला 4, LJP ला 1, तृणमूलला 1 आणि अपक्षांना 1 जागा मिळाली होती. त्यानंतर इथं भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडीचं सरकार स्थापन झालं, ज्यामध्ये NPF, NPP आणि LJP यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. आता पुन्हा एकदा भाजप सत्तेची चावी आपल्या हातात घेण्याची चिन्हं आहेत.

Web Title: Manipur Election Result Bjp Candidates Win In 28 Out Of 60 Constituencies

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top