Nagaradhyaksha Election Poll Results
ESAKAL
योगेश फरपट
अकोला : जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी यांनी स्पष्ट शब्दांत पक्षाच्या कामगिरीवर भाष्य करत आत्मपरीक्षणाची गरज व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या निवडणुकांत पक्षाने ताकदीने लढा दिला, असे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ‘सकाळ’शी बोलतांना सांगितले.