

Deglur Municipal Council Election 2025: Voter Turnout Overview
Sakal
देगलुर : देगलुर नगर परिषदेच च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार ता.२ रोजी उत्साहात मतदान पार पडले. सायंकाळी शहरातील पाच मतदान केंद्रावर रात्री ७ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती . यावेळी ७१:३०% सरसरी मतदान झाल्याचे निवडणूक विभागातुन सांगण्यात आले . या मतदानात ६९:७५ % स्त्री मतदारांनी सहभाग नोंदवला तर ७२:८९% पुरुष मतदारांनी सहभाग नोंदवला आहे. देगलूर नगरपरिषदेसाठी १३ प्रभागातून २७ नगरसेवक आणि एक लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली.